Pimpri : चालकाला धमकी देत कचरा गोळा करणारा ट्रक पळवला

एमपीसी न्यूज – शहरात कचरा गोळा करणाऱ्या ट्रकला तिघांनी भर दिवसा पळवला ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी अकरा वाजता मोहननगर परिसरात घडली.

_MPC_DIR_MPU_II

भारत साहेबराव क्षीरसागर (वय 35, रा .गांधीनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समीर अरविंद धुमाळ (वय 35, रा. मोहननगर, चिंचवड) व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षीरसागर हे कचरा गोळा करणा-या ट्रकवर (एम एच 11 / एम 4303) चालक म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी ते त्यांच्या तीन साथीदारांसह मोहननगर येथे कचरा गोळा करत होते. त्यावेळी धुमाळ आणि त्याच्या दोन साथीदारांनी क्षीरसागर यांना धमकी देत मोहननगर येथे एस.बी.चौकाकडून रामनगरकडे घेण्यास सांगितला. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला घ्यायला लावून क्षीरसागर यांना धमकी देत व शिवीगाळ करत जबरदस्तीने ट्रकच्या खाली उतरवून ट्रक पळवून नेला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.