Pratapgad : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीजवळच अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज  : आज शिवप्रताप दिन..आजच्याच दिवशी (Pratapgad) स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला होता. आजच्याच दिवशी साताऱ्यातून, प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यापासून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अफजलखानाच्या कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई सुरू आहे. 

प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी जेसीबी आणि पोकलेन मशीन तैनात करण्यात आले आहेत. कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत..

स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा छत्रपती (Pratapgad) शिवाजी महाराजांनी वध केला होता.

त्यानंतर प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी त्याचा दफनविधी केला होता. तेव्हापासून ही कबर प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. सुरुवातीला ही कबर काही फूट जागेवर होती. मात्र नंतरच्या काळात त्या ठिकाणी असणाऱ्या वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले. अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप ही स्थानिक नागरिकांकडून केला जात होता.

त्यानंतर अफजलखानाच्या कबरीभोवती करण्यात आलेलं अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी 2006 मध्ये स्थानिक नागरिकांनी आंदोलन हे केलं होतं. तेव्हापासून हा वाद कोर्टात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई हायकोर्टाने कबरी भोवती झालेलं अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला पुढे सुप्रीम कोर्टात आव्हानही देण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने ही बांधकाम अनधिकृत ठरवत तोडण्याची सूचना दिली होती. मात्र तेव्हापासून हे अवैध बांधकाम पाडलं जात नव्हतं.

मात्र शिंदे फडणवीस सरकारने आज जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या मदतीने कबरीजवळील अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली आहे. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच सुरुवात झाली. कमालीची गुप्तता पाळत आज पहाटेपासून अतिक्रमण पाडण्यास सुरुवात झाली आहे.

IMD : पुण्यात काही दिवस असणार ढगाळ वातावरण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.