Pune Crime : ….अन् महिलेचा तो बनाव उघडा पडला

एमपीसी न्यूज : दिवस चार नोव्हेंबरचा..वेळ दुपारची.. एक (Pune Crime) महिला आपल्या मुलाला फोन करून पानशेत जवळील मूळ गावातून घरी येत असल्याचे सांगते.. मात्र रात्र झाल्यानंतरही ही महिला घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडतात.. शोधाशोध सुरू होतो.. तरीही ही महिला सापडत नाही.. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र पुणे पानशेत रस्त्यावरील एका गावाच्या हद्दीत या महिलेची दुचाकी अपघातग्रस्त अवस्थेत सापडते.. आणि कुटुंबीयांच्या मात्र पायाखालची जमीन सरकते..

झाडाझुडपात अडकलेली दुचाकी आणि जवळच असणाऱ्या पाण्याजवळ आढळलेली चप्पल पाहून ही महिला पाण्यात बुडाली असावी असा कयास बांधला जातो.. त्या दृष्टीने या पाण्यातच शोधकाम सुरू केले जाते.. पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान दोन दिवस या पाण्यात महिलेचा शोध घेतात.. मात्र शोध काही लागत नाही.. यामुळे कुटुंबीय आणखीनच चिंतेत पडतात..

मात्र घटनास्थळी असणाऱ्या पोलिसांना काही वेगळाच संशय येतो.. अपघातग्रस्त ठिकाणाची बारकाईने पाहणी केली असता हा काहीतरी वेगळाच प्रकार असण्याची दाट शक्यता पोलिसांना वाटते.. आणि त्या दृष्टीने तपास केल्यानंतर एक (Pune Crime) वेगळीच माहिती समोर येते.. पोलिसांच्या तपासादरम्यान ही महिला कोंढवा येथे असल्याचे समोर आले.. या महिलेने कौटुंबिक वादातून हा सर्व प्रकार केल्याचं त्यानंतर समोर आला आहे.. त्या मुलीचा बनाव उघडा पडला, मात्र दोन दिवस पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना शोधकाम राबवाव लागलं.

Pratapgad : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीजवळच अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.