Pune : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पायी दिंडीमध्ये हिंदू राष्ट्राचा उद्घोष      

एमपीसी न्यूज –  सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या 77 व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिंडीमध्ये हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यात आला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासह अन्य अनेक समविचारी संघटनांचे कार्यकर्ते या दिंडीत सहभागी झाले होते.

भिकारदास मारुती मंदिर येथून शंखनाद आणि धर्मध्वजाचे पूजन करून या दिंडीला प्रारंभ झाला. पुढे शनिपार चौक – लक्ष्मी रस्ता – अलका टॉकीज चौक – लकडी पूल मार्गे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे दिंडीची सांगता झाली.    नऊवारी साडी परिधान केलेल्या रणरागिणी, पारंपारिक वेशात सहभागी झालेले कार्यकर्ते, क्रांतिकारकांच्या वेशातील बालसाधक, स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे क्षात्रवीर हे या दिंडीचे वैशिष्ट्य ठरले. चौकाचौकांत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि भवानीमाता यांची प्रतिमा असलेल्या पालख्यांचेही अनेकांनी दर्शन घेतले. शनिपार चौक, लक्ष्मी रस्ता,अलका टॉकीज चौक आदी ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.