Agrawal Sanmelan : अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे डिसेंबरमध्ये भरणार महाअधिवेशन

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय अग्रवाल (Agrawal Sanmelan) संमेलनाच्या वतीने संपूर्ण भारतातील विविध राज्यांतील अग्रवालांना जोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, तसेच त्यांना एकाग्र करण्यासाठी पुण्यातील डेक्कन येथे 24 ते 25 डिसेंबर दरम्यान महाअधिवेशनचे आयोजिन करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या रविवारी (दि.16) झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग, राजेश अग्रवाल, शिवकांत केतन, अनूप गुप्ता, अजय अग्रवाल यांच्यासह अनेक उपस्थित होते. अग्रवाल समाजाचे 10 कोटींहून अधिक लोक जगभरात राहतात. त्यांनी एकत्र यावे, या मुख्य उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले असून त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

ज्याप्रमाणे पुण्यात अग्रवाल समाजाचे अधिवेशन होत आहे, त्याचप्रमाणे देशभरात आयोजन करण्यासाठी आणि भगवान अग्रसेनजींची तत्त्वे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अग्रोहाला तीर्थक्षेत्र म्हणून स्थापित करण्यासाठी अखिल भारतीय अग्रवाल संमेलनचे 46 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.

Cyber Crime : ऑनलाइन पोपटांची ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाचा सायबर चोरट्यांनी केला पोपट

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष (Agrawal Sanmelan) गोपाल शरण गर्ग यांनी सांगितले की, या महासंमेलनाच्या माध्यमातून अनेक मान्यवर पारंपारिक संस्कृतीसारखे काही विषय विसरून पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार करत आहेत, यासोबतच इतरही काही विषयांवर चर्चा करणार असून येत्या 10 वर्षात अग्रवाल समाजात काय घडणार आहे. घडेल, ते कसे घडेल आणि अग्रवाल समाज सर्वांच्या हितासाठी कसे कार्य करेल, या विषयांवर चर्चा केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.