Cyber Crime : ऑनलाइन पोपटांची ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाचा सायबर चोरट्यांनी केला पोपट

एमपीसी न्यूज : पुण्यातील एका पक्षीप्रेमीला ऑनलाइन (Cyber Crime) पोपट विकत घेणे चांगलेच महागात पडले आहे. पक्षीप्रेमी असणाऱ्या एका तरुणाने ऑनलाइन पद्धतीने पैसे भरून दोन पोपटांची ऑर्डर केली होती. मात्र त्याला हे पोपट मिळालेच नाहीत.

या तरुणाने तक्रार दिल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सायबर चोरट्यांनी या तरुणाचा पोपट केल्याचे समोर आले आहे. अक्षय दिलीप देशमुख (वय 28) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी अक्षय देशमुख हे पक्षप्रेमी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका संकेतस्थळावरून मकाऊ जातीचे दोन पोपट विकत घेतले होते. सुरुवातीला त्यांनी एका संकेतस्थळावरच या पोपटाची पाहणी केली. आणि पोपट पसंत पडल्यानंतर एक लाख रुपयात दोन पोपट खरेदी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी समोरील (Cyber Crime) व्यक्तीला एक लाख रुपये पाठवले देखील होते.

Sinhagad Crime : प्रेयसीसमोर प्रियकराने घेतला गळफास

हा सर्व प्रकार सप्टेंबर 2021 मध्ये घडला होता. त्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांना अद्यापही पोपटांची डिलिव्हरी मिळाली नाही. समोरील व्यक्तीला फोन केल्यानंतर आज मिळतील उद्या मिळतील असे म्हणत त्याची फसवणूक सुरूच होती. अखेर आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर अक्षय देशमुख यांनी वानवडी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.