Sinhagad Crime : प्रेयसीसमोर प्रियकराने घेतला गळफास

एमपीसी न्यूज : प्रेयसीसमोर गळफास घेऊन एका 25 वर्षीय (Sinhagad Crime) तरुणाने आत्महत्या केली आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गोळेवाडी येथील एका लॉजवर हा सर्व प्रकार घडला. प्रेयसीचे लग्न ठरल्यानंतर प्रियकरानं हे टोकाचे पाऊल उचललं. प्रेयसी समोरच आणि तिच्याच ओढणीने त्याने गळफास घेतला. 

Pune Rape : माहेरी आलेल्या विवाहितेला ब्लॅकमेल करून वारंवार बलात्कार; 57 वर्षीय शेजाऱ्यावर गुन्हा दाखल

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दिघी परिसरातील (Sinhagad Crime) राहणारा हा तरुण प्रेयसी सोबत सिंहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गोळेवाडी येथील एका लॉजवर गेला होता. तीन वर्षापासून या दोघांचे प्रेम संबंध होते. दरम्यान प्रेयसीचे लग्न जमले असल्यामुळे तो तणावात होता. या लॉजवर गेले असतानाही त्यांच्यात वाद झाला. प्रेयसी त्याला समजवत असतानाच त्याने तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे. मी कसा जगू असं म्हणत तिच्याच ओढणीनेच गळफास लावून घेतला आणि आत्महत्या केली.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. हवेली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.