Pimpri: शहरात डिसेंबरमध्ये होणार महापौर परिषद 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांना हेवा आहे. राज्यातील 27 महापालिकेच्या महापौरांना शहराबद्दल मोठी उत्सुकता आहे. महापौरांची आगामी महापौर परिषद डिसेंबर महिन्यात शहरात घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

राज्यातील महापौरांची 18 वी महापौर परिषद रविवारी (दि.28) नागपूरमध्ये पार पडली. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाज बांधणी, जलसंपदा जलस्त्रोत मंत्री नितीन गडकरी होते प्रमुख उपस्थित होते. महापौर परिषदेचे अध्यक्ष तथा मुंबईचे महापौर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर, व उपाध्यक्ष तथा नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, महापौर राहुल जाधव यांच्यासह 19 शहरांचे महापौर आणि आमदार जोगेंद्र कवाडे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

महापौर जाधव यांनी परिषदेतील माहिती पत्रकारांना दिली. महापालिकांनी पाणीपट्टी कर, नियमित मिळकत कर वसूलीवर भर द्यावा. त्याच्या माध्यमातून निधीमध्ये वाढ करण्यात यावी. त्यामुळे महापालिका आर्थिकदृष्टया सक्षम होतील, असे मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर, विकास आराखड्यानुसार शहर विकासाचे काम करावे. त्यामुळे भविष्यात अडचणी येत नाहीत, असे मार्गदर्शन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पिंपरी-चिंचवडसारखे कोणतेच शहर नाही. हे शहर आणखीन सुंदर, चांगले बनविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राहण्यायोग्य शहरात 69 वा क्रमांक का आला हा प्रश्नच आहे. ज्यांनी शहर राहण्यायोग्य नाही असे जाहीर केले. त्यांनीच राहण्यायोग्य का नाही? याचे उत्तर द्यावे, असेही महापौर जाधव म्हणाले. शहर औद्योगिकनगरी आहे.  शहरात कंपन्या आहेत. त्यामुळे शहरात प्रदुषण आहे.

शहरात दोन दिवसीय महापौर परिषद घेण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. शहरात होणा-या परिषदेला राज्यातील 27 महापालिकांचे महापौर उपस्थित राहतील. राज्यातील महापौरांना शहराच्या विकासाची माहिती देण्यात येईल. उड्डाणपुल, क्रीडांगणे, उद्याने, सायन्स पार्क, प्रेक्षागृहे,   स्मशानभूमी असे सर्व प्रकल्प दाखविण्यात येणार आहेत. तसेच राज्याला भेडसावत असणा-या पाणी आणि कच-याच्या प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1