Dehuroad : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेचे 70 हजार 860 रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी सातच्या सुमारास शिंदे वस्ती रावेत येथे घडली.

उषा रमेश ठाकूर (वय 60, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा आणि त्यांची बहीण नूतन जगन्नाथ ठाकूर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. मॉर्निंग वॉकवरून परत घरी येत असताना त्या शिंदे वस्ती मधील पाईपलाईन रोड येथे आल्या असता दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातून 70 हजार 860 रुपये किमतीचे सोन्याचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.