Pimpri : महापालिका आपत्ती व्यवस्थापन टीम पूरग्रस्तांच्या मदतीला धावली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन विभागाची सुसज्ज टीम सांगली येथे पूरग्रस्तांच्या मदतीला रवाना झाली. पाण्याचा टँकर, जेटिंग व्हॅन, अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी अशी सुसज्ज टीम मदतीला गेली आहे.

पिंपरी येथून या टीमला आज (रविवारी) निरोप देण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रशांत पाटील, प्रवीण लडकत, दत्तात्रय रामगुडे आदी उपस्थित होते.

शनिवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तीन ड्रेनेज जेटिंग मशीन, आठ कर्मचारी, अग्निशमन विभागाचे तीन बंब आणि आठ कर्मचारी पाठवण्यात आले. त्यानंतर आज (रविवारी) एक पाण्याचा टँकर, पाच जेटिंग व्हॅन, ५० कर्मचारी, प्रथमोपचाराचे साहित्य अशी सुसज्ज टीम पाठवण्यात आली आहे. जेटिंग मशीनच्या साहाय्याने रस्ता साफ करण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे पूरग्रस्त भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना मदत करून पाणी कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी या टीमची मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.