Maval : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदलाचा आदेश रद्द

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर अमरजाई मंदिर ते काळोखे पेट्रोल पंप (Maval) या दरम्यान रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अमरजाई मंदिर ते काळोखे पेट्रोल पंप या दरम्यानच्या वाहतुकीत बदल केला होता. मात्र पोलीस उपयुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आज (सोमवारी, दि. 15) पुन्हा आदेश काढत वाहतुकीतील बदलाचा आदेश रद्द केला आहे.

 

महामार्ग लगतचे अतिक्रमण काढताना वाहतूक नियमनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. हा बदल 16 ते 18 मे या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत करण्यात येणार होता.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी सोमवारी पुन्हा एक आदेश काढत रविवारी त्यांनीच काढलेला आदेश रद्द केला आहे. वाहतूक बदलाचा आदेश रद्द झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.