Pimpri : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले 

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पायी जाणार्‍या महिलेचे  15 व 8 ग्रॅम वजनाचे अशी 67 हजारांचे दोन मंगळसूत्र हिसकावले. ही घटना शुक्रवारी सव्वाचारच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे घडली.

कल्पना रघुनाथ सांगळे (वय-53, रा. रेणूका अविष्कार सोसा. दळवीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सांगळे या शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील सेहगल कंपनी शोरूमच्या समोरील रस्त्यावरून पायी जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील 15 व 8 ग्रॅम वजनाचे 67 हजारांचे दोन मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.  पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.