Bhosari : पादचारी तरूणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाचा चोरट्याने मोबाईल हिसकावला. ही घटना भोसरीमधील सेक्टर 10 येथे 14 जुलै रोजी रात्री घडली.

निरज नामदेव घाडगे (वय 27, रा. सेक्टर नंबर 10, एमआयडीसी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरज रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी निरज यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.