Lonavala : तुंगार्ली धरणात बुडून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – तुंगार्ली धरणाच्या जलाशयात बुडून अमित सिंग (वय 20, रा. गढवाल, उत्तराचल प्रदेश) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

_MPC_DIR_MPU_II

अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता अमित याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबतची माहिती समजल्यानंतर तात्काळ घटनास्थळावर पोहचलेल्या शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे महेश मसणे, प्रणय अंभोरे, निकीत तेलंगे, अशोक उंबरे, अंकुश महाडिक, विकास मावकर, अभिजित बोरकर, राहुल देशमुख, नामदेव अंभोरे, राजेंद्र कडू, आनंद गावडे व सुनील गायकवाड यांच्या पथकाने रोपच्या व पंजाच्या सहाय्याने अमित बुडाला असलेल्या ठिकाणी शोध घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.