Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची उत्साहात प्राणप्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज – मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया… च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झाले. मुख्य मंदिरापासून कोतवाल चावडी येथील उत्सवाच्या पारंपरिक जागेपर्यंत फुलांनी सजविलेल्या गरुड रथातून श्रींची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली.

शहरातील संपूर्ण वातावरण गणेशमय झाले आहे.पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या श्रींची मुख्य मंदिरापासून गरुड रथातून मिरवणुकीला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. यावेळी देऊळकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधूंचे सनई तसेच दरबार बँड, प्रभात बँड आणि गंधाक्ष ढोल ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी अकरा वाजून 37 मिनिटांनी  करण्यात आली. श्रींच्या मूर्तीसोबत देवी सिद्धी, देवी बुद्धी तसेच गणेश परिवारातील मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Ganeshostav : अथर्वशीर्ष पठणानिमित्त पुण्यात काही ठिकाणी वाहतूकीत बदल

प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मुख्य मंदिरापासून श्रींची आगमन मिरवणूक सकाळी 8.30 वाजता फुलांनी साकारलेल्या गरुड रथातून काढण्यात आली. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणुकीची सांगता झाली. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधूंची सनई हे मिरवणुकीच्या अग्रभागी होते . तसेच दरबार बँड, प्रभात बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी 12.15 पासून भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.