Ganeshostav : अथर्वशीर्ष पठणानिमित्त पुण्यात काही ठिकाणी वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या समोर उद्या (दि.1) पहाटेपासून अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होणार आहे.त्यामुळे शिवाजी रोड ते रामेश्वर चौक व आप्पा बळंवत चौक ते बुधवार चौक येथे वाहनास पूर्ण बंदी असणार आहे. पहाटे चारपासून अथर्वशीर्ष पठण संपेपर्यंत हा बदल असणार आहे.

गुरुवारी पाचपासून अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये हजारो महिला भाविक सहभागी होतात.यावेळी कोणतीही अजचण येऊ नये किंवा वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा बदल केला जाणार आहे.

  • शिवाजी रोड – जिजामाता चौक ते रामेश्वर चौक या मार्गावर वाहने पूर्णपणे बंद असणार आहेत. याला पर्यायी मार्ग म्हणून गाडगीळ पुतळा – जिजामाता चौक डावीकडे वळून रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणा प्रताप मार्गावरून गोविंद हलवाई चौक उजवीकडे वळून गोटीराम भैय्या चौक डावीकडे वळून शिवाजी रोडनेस्वारगेटकडे जाता येईल.

  • दुसरा मार्ग आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा देखील बंद असणार असून अप्पा बळंवत चौक डावीकडे वळून बाजीराव रोडने फुटका बुरुज मार्गे गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून जिजामाता चौक नंतर डावीकडे वळून इच्छित स्थळी जाता येईल.
  • तसेच लक्ष्मी रोडवर विजय मारूती चौक, सोन्या मारूती चौकापासून आवश्यकतेनुसार वाहतूक वळवून ती विजय मारूती चौक – शुक्रवार पेठ पोलीस चौकी चौक, नेहरू  चौक, श्रीनाथ टॉकीज, रामेश्वर चौक येथून इच्छित स्थळी जाता येईल.

वरील मार्गानुसार वाहतूक करत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व गैरसोय टाळावी, असे आवाहन पुणे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपआयुक्त राहूल श्रीरामे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.