Pune News : ई – कचरा संकलनासाठी पुण्यात सरसावली गणेश मंडळे

एमपीसी न्यूज –  गणेशोत्सावाच्या उत्साहात केवळ जल्लोषच नाही तर सामाजिक भान जपत पुण्यातील वंचित विकास व गणेश मंडळांनी ई – कचरा संकलनाचा संकल्प केला आहे.केवळ संकलन नाही तर दहा दिवस ई-कचऱ्याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे.

पुण्यातील लोकमान्य टिळक सार्वजनिक मंडळ, नागनाथ पार सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पेरुगेट चौक मित्र मंडळ, समाज विकास मंडळ, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, हिंदमाता तरुण मंडळ, जय जवान मित्र मंडळ, सोमवार पेठ गोसावी पुरा सार्वजनिक मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्ट, कस्तुरे चौक तरुण मंडळ, सुंदर गणपती तरुण मंडळ, ओम हरिहरेश्वर मंडळ, मुठेश्वर मित्र मंडळ, बालकुमार तरुण मंडळ, शनिवार पेठ मेहुणपुरा गणेश मंडळ, विनायक मित्र मंडळ, ऋतुराज मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ,अरण्येश्वर, अशोक तरुण मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट, एकता मित्र मंडळ कात्रज, नवजीवन मित्र मंडळ, माती गणपती मंडळ ट्रस्ट, वीर तानाजी तरुण मंडळ यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

यामध्ये गणेशोत्सवात दहा दिवस गणेश मंडळांनी ई-कचरा संकलन केंद्रे उभारली असून नारायण पेठ, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, नाना पेठ, गणेश पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, कसबा पेठ, डेक्कन, मार्केटयार्ड, सहकारनगर, अरण्येश्वर, कात्रज, सिंहगड रस्ता आदी भागातील गणेश मंडळांनी ‘ई-कचरा’ संकलनात पुढाकार घेतला आहे.संकलित ई-कचरा वंचित विकासच्या नारायण पेठेतील कार्यालयात असलेल्या कायमस्वरूपी ई-कचरा जमा करण्याचे आवाहन वंचित विकासतर्फे करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.