Pavana Dam News : पवना धरणातून विसर्ग बंद; गेल्या वर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 2.27 टक्के जास्त

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरासह मावळ वासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात या महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने धरण 100.00 टक्के भरले आहे.पण धरण क्षेत्रात सलग चार दिवस पाऊस नसल्याने बुधवारीपण विसर्ग बंद आहे.

मंगळवारी दिवसभरात सकाळी 6 पासून ते बुधवारी सकाळी 6 वा पर्यंत 0 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच आज सकाळपर्यंत एकूण 2281 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस 2083 मि. मी. होता.त्यामुळे 198 मिमी पाऊस यावर्षी आजपर्यंत जास्त झाला आहे.

तसेच आजचा पाणीसाठा 100 टक्के आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 97.73 टक्के होता.त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 2.27 टक्के जास्त आहे.

पिंपरी चिंचवड शहरासह मावळ तालु्क्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्यस्रोत पवना धरण आहे.महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते.शहरला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बांधर्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करून शहवासियांना पाणी पुरवठा केला जातो.

पवना धरणातील परिस्थिती

गेल्या 24 तासात झालेला पाऊस : 0 मिमी

1 जूनपासून झालेला पाऊस : 2281 मिमी

गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस : 2083 मिमी

धरणातील सध्याचा पाणीसाठा : 100.00 टक्के

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा : 97.73 टक्के

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ  : 0.0 टक्के

आजची पाण्याची आवक: 0.47 द. ल. घ. मी

आजपर्यंत पाण्याची आवक: 288.36 द. ल. घ. मी

धरणतील पाण्याचा उपयुक्त पाणीसाठा : 240.97 द. ल. घ. मी

धरणतील पाण्याचा एकूण पाणीसाठा : 272.11 द. ल. घ. मी

धरणातील पाणी पातळी: 613.26 मीटर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.