Panshet Dam News : पानशेत धरणातून 550 क्युसेक्स विसर्ग चालू

एमपीसी न्यूज  : पानशेत धरणातून रात्री 12.00 वा विद्युत निर्मिती केंद्र द्वारे 550 क्युसेक्स विसर्ग चालू करण्यात आला आहे.आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी, असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.

 

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.

पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधण्यात आले आहे.आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.