Pimpri: ‘स्वाईन फ्ल्यू’साठी ‘ऑस्लेटॅमिविअर’ कॅप्सूलची खरेदी

एमपीसी न्यूज – पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे ‘स्वाईन फ्लू’चा प्रार्दुभाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे तातडीने  ‘ऑस्लेटॅमिविअर’ कॅप्सूलची खरेदी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे ‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 15 दिवसात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले तब्बल 17 रुग्ण आढळले आहेत. तर, वर्षभरात दोघांचा मृत्यू झाला आहे. वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्वाईन फ्ल्युला आळा घालण्यासाठी पालिकेच्या दवाखाना, रुग्णालयातर्फे जनजागृती राबविण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, हौसिंग सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.

‘स्वाईन फ्लू’चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी ‘ऑस्लेटॅमिविअर’ कॅप्सूलची खरेदी करण्यात येणार आहे.  दहा हजार गोळ्या खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी 10 गोळ्यांचे एक असे प्रती पॉकेट 398 रुपये असे एकूण 3 लाख 98 हजार रुपयांच्या गोळ्या खरेदी करण्यात येणार आहेत. ही तातडीची बाब म्हणून थेट पद्धतीने गरजेनुसार औषध खरेदी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.