Pune : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना ज्योतीचे आयोजन

 

एमपीसी न्यूज- भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74 जयंतीनिमित्त राजीव गांधी सदभावना ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे कँम्प येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सदभावना ज्योतीला सुरुवात झाली. या सदभावना ज्योतीची ससून हॉस्पिटल चौकात सांगता झाली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन पुरस्कार विजते पद्मश्री शांताराम बापू जाधव, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, हरीश चिकणे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मान्यवर उपस्थित होते. या सदभावना ज्योतीचे संयोजन प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे, मुख्तार शेख आणि सदानंद शेट्टी यांनी केले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.