BNR-HDR-TOP-Mobile

Pune : संजय काकडे यांच्या ‘त्या’ वक्तव्याला फारसे महत्त्व नाही – आमदार माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज – माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल भाजपाचे सहयोगी राज्यसभेचे खासदार संजय नाना काकडे यांनी केलेल्या वक्तव्याला फारसे महत्त्व नसल्याचे पुणे शहर भाजपच्या अध्यक्ष तथा आमदार माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पंकजा यांच्या बाबतीत काकडे यांनी असे बोलायला नको होते. भाजपाचा त्यांच्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही. मागील काही दिवसांत ज्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. त्यांना भाजपात फूट पाडायची आहे, असा आरोपही मिसाळ यांनी केला. मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम केले. त्यांनीही आम्हाला सर्वांना सोबत घेऊन पाच वर्षे सरकार चालवले. आता अशा काही शक्ती आहेत की, ज्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना पक्षात फूट पाडून स्वतःची पोळी भाजायची आहे का, असा सवालही मिसाळ यांनी उपस्थित केला.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत घेतलेला मेळावा हा अस्तित्व टिकवण्यासाठी होता. अशा शब्दांत भाजपचे सहयोगी खासदार संजय नाना काकडे यांनी टीकास्त्र सोडले. स्व. गोपीनाथ मुंडेंच्या नावामुळे गर्दी जमली होती. पंकजा आणि खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. दोघांचाही रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. काकडे यांनी पंकजा यांच्या वक्तव्याचा समाचार घेत फडणवीस यांची बाजू सावरून नेली.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3