Pune : गरवारे कॉलेज, पीसीसीओईचा संघर्षपूर्ण विजय

सृजन करंडक 2019 फुटबॉल

एमपीसी न्यूज – गरवारे कॉलेज आणि पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) संघांना सृजन करंडक 2019 फुटबॉल स्पर्धेत विजयासाठी संघर्ष करावा लागला. या विजयासह या दोन्ही संघांनी उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

ढोबरवाडी येथील पीडीएफएच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत गरवारे कॉलेजने टायब्रेकरमध्ये सिंहगड कॉलेज ऑफ सायन्सचा 3-2 असा पराभव केला. नियोजित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता.

शूट आऊटमध्ये गरवारे कॉलेजकडून प्रथमेश ताकवले, अॅलन चकमा, अथर्व भोसले यांनी गोल केले. सिंहगडकडून सागर भारद्वाज, शब्बीर अहमद यांनाच गोल करण्यात यश आले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात पावसाचा अडथळा आला. मात्र, पावसातही खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. खराब झालेल्या मैदानावर खेळताना खेळाडूंच्या हालचालींवर मर्यादा जरुर आल्या होत्या. पण, कुणाचाही उत्साह कमी झाला नव्हता. पूर्वार्धात पीसीसीओई संघाने केलेला एकमात्र गोल सामन्यात निर्णायक ठरला. सामन्याच्या 15 व्या मिनिटाला श्रेयस टकले याने नोंदविला. अखेरीस याच गोलच्या जोरावर त्यांनी आकुर्डीच्या एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 1-0 असा पराभव केला.

निकाल –

गरवारे कॉलेज 0, 3 (प्रथमेश ताकवले, अॅलन चकमा, अथर्व भोसले) वि.वि. सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स 0, 2 (सागर भारद्वाज, शब्बीर अहमद) मध्यंतर 0-0

पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी 1 (श्रेयस टकले 15वे मिनिट) वि.वि. एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 0. मध्यंतर 0-0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like