_MPC_DIR_MPU_III

Dubai : झिरो टू हिरो पुस्तकाची तिसरी आवृत्ती दुबईमधून प्रकाशित

भोसरीतील उद्योजकांची उत्तुंग भरारी

एमपीसी न्यूज – गल्फ महाराष्ट्र फोरमने आयोजित केलेल्या महाबीज 2018 या मराठी उद्योजकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत झिरो टू हिरो या पुस्तकाच्या तिस-या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुस्तक प्रकाशाचा कार्यक्रम दुबईमधील जे एम मेरीएट येथे शनिवारी (दि. 13) झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काही उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रात अलौकिक ठसा उमटवला आहे, त्यांच्या यशोगाथा या पुस्तकातून समाजासमोर मांडण्यात आल्या आहेत.

पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, दुबईतील भारतीय राजदूत विपुलजी, झाबियाचे राजदूत डाॅ. सॅम ओमारा आदि उपस्थित होते. तसेच दुबईतील प्रसिद्ध उद्योजक सुनिल मांजरेकर, चिरंतन जोशी, राहुल तुळपूल्ले, सचिन जोशी, सचिन देवधर हे देखील उपस्थित होते.

झिरो टू हिरो या पुस्तकात शून्यातून विश्व निर्माण करणा-या उद्योजकांच्या थक्क करणा-या प्रवासाची गाथा उलगडून सांगण्यात आली आहे. प्रामाणिकपणे प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारे अॅड. सतीश गोरडे, प्रामाणिकपणे कष्ट करत, माणसे जोडत, जगाशी नवी नाती जोडणारे अरुण इंगळे, डॉक्टरी हा व्यवसाय नसून एक सेवाव्रत आहे. याचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे, या उक्तीप्रमाणे वागणारे डॉ. रोहिदास आल्हाट, आपल्या बुद्धीवर आणि कार्यशक्तीवर विश्वास ठेऊन ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात प्रगतीची शिखरे पादाक्रांत करणारे मुरलीधर साठे, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमातून 30 हजारांच्या भांडवलवरून आज 45 कोटींची उलाढाल करणारे गुलाबराव धुमाळ, आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या भाजी विक्रेता ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक असा थक्क करणारा प्रवास करणारे मुकुंद आवटे आदींच्या यशगाथा या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1