-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News : शहरातील एमआयडीसीचा ‘या’ भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुध्दीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या (गुरूवारी) एमआयडीसीचा सकाळी आणि संध्याकाळी होणारा पाणीसाठा बंद असणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुध्दीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी आणि सायंकाळी एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी  सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा  करुन ठेवावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले आहे.

‘या’ भागातील पाणी पुरवठा असणार बंद!

पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहुरोड, कासारवाडी फुगेवाडी, निगडी, सी.एम. ई. आर अॅन्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल., कॅटोंन्मेन्ट बोर्ड, ओ.एफ. डी. आर. या भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद असणार आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn