Pune : वडगावशेरीत मेट्रोचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण होईल – आमदार मुळीक

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) ते रामवाडीपर्यंतच्या (रिच ३) मार्गावरील काम गतीने पुढे सरकत असल्याने ते निर्धारीत वेळेत पूर्ण होईल. त्यामुळे नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल, अशी अपेक्षा आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केली. 
आमदार जगदीश मुळीक यांनी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील येरवडा ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या कामाची पाहाणी करून आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. महामेट्रोचे रामनाथ सुब‘मण्यम, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रकाश वाघमारे, अमोल मोहोळकर, नगरसेवक योगेश मुळीक, सुनीता गलांडे, शीतल सावंत, संदीप जर्‍हाड, नाना सांगडे, संतोष राजगुरु, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर शिंदे, महेश गलांडे, गणेश देवकर, राजेंद्र एंडल, कुंतीलाल चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मुळीक म्हणाले, ‘सिव्हिल कोर्ट ते रामवाडी या मेट्रो मार्गावर १३२४ खांब उभारणे अपेक्षित आहे. त्यापैकी ६२५ खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यात वडगावशेरी मतदारसंघातील ११६ खांबांचा समावेश आहे. या मार्गावर १७४ पीलर कॅपचे तर वडगावशेरीत २५ पिलर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. पोर्टल पिअर्स, पिअर ङ्गर्स्ट लिफ्ट, पिअर कॅप, सेग्मेन्ट कास्टिंग व उभारणीचे काम योग्य गतीने पुढे जात आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२० या निर्धारीत वेळेत हा मार्ग पूर्ण होणे अपेक्षित आहे.’
आमदार मुळीक पुढे म्हणाले, ‘पर्णकुटी चौक ते गुंजन चौक आणि पुढे रामवाडी ते फिनिक्स मॉलपर्यंत महामेट्रोकडून काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, रुबी हॉल क्लिनिक, बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी अशा मेट्रो स्टेशनचे बांधकामांना गती दिली जात आहे. मेट्रो रामवाडीपासून पुणे विमानतळापर्यंत नेण्यास केंद्रीय कॅबिनेट समितीनेही शिफारस केली आहे. विमानतळापर्यंतच्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी मनपा अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विमानतळ मार्गे वाघोलीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. विस्तारीत टप्प्यात लवकरच त्याला मान्यता मिळणे अपेक्षित आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.