Wakad : परिसरात अश्लील पोस्टर लावून महिलेची बदनामी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेच्या घराच्या आजूबाजूला आणि परिसरात महिलेच्या फोटोसह अश्लील मजकूर असलेले पोस्टर लावले. यामुळे महिलेची बदनामी झाली. याबाबत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

याप्रकारणी 40 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड मधील स्लिम फिट एरोबिक्स पिंक सिटी रोड परिसरात अज्ञात इसमांनी बदनामीकारक पोस्टर लावले. त्यामध्ये फिर्यादी महिलेचा फोटो आणि बदनामीकारक मजकूर होता. महिलेच्या घराच्या आजूबाजूला हे पोस्टर लावून अज्ञाताने त्यांनी बदनामी केली. हा प्रकार 24 जुलै रोजी उघडकीस आला. याबाबत त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.