Pune News : सॅनफ्रान्सिस्को ते पुणे प्रवासादरम्यान प्रवाशाच्या महागड्या वस्तूंची चोरी

एअर फ्रान्सच्या कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सॅनफ्रान्सिस्को ते पुणे प्रवास करून पुण्यातील घरी परत आल्यानंतर आपल्या बागेतील महागड्या वस्तूंची चोरी झाल्याचे प्रवासी महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी एअर फ्रान्स कंपनीमधील अज्ञात कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गौरी गिरी शिंगोटे (वय 45) या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेने मागील महिन्यात सनफ्रान्सिस्को ते पुणे असा प्रवास करून त्या पुण्यातील आपल्या घरी परतल्या होत्या. यावेळी बॅगमधील कपडे, गिफ्ट, आइटम, चॉकलेट, परफ्यूम, हॅन्डबॅग, पर्सेस, खेळणी असे सामान चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या दोन बँक एअर फ्रान्स कंपनीच्या कर्मचायांच्या ताब्यात विश्वासाने दिल्या होत्या. त्या कर्मचाऱ्यांच्या सामानाचा अपहार केल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.