Bhosari : कंपनीतून तीन लाखांच्या मालाची चोरी

एमपीसी न्यूज – कंपनीतून तीन लाख रुपयांच्या मालाची चोरी झाली. ही घटना इंद्रायणी नगर, भोसरी एमआयडीसीमधील यश फोरक्लिफ्ट हायरिंग सर्व्हिसेस या कंपनीत घडली.

विनोद हरिभाऊ कदम (वय 44, रा. जुना दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद यांची भोसरी एमआयडीसीमध्ये यश फोरक्लिफ्ट हायरिंग सर्व्हिसेस ही कंपनी आहे. 27 ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या कंपनीतून अज्ञात चोरट्याने दोन गियर बॉक्स असेम्ब्ली, दोन रियर अॅक्सेल असेम्ब्ली, एक बूम लिफ्टिंग सिलेंडर, दोन फोर्क असेम्ब्ली, चार लायनर, चार पिस्टन, दोन पत्रे, तीन मशीन वायर, दोन गार्ड, असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.