Pune : प्रशासन, शिक्षण, आरोग्य सेवेत पुणे मागेच तरीही राहण्यासाठी ‘एक नंबर’ शहर 

एमपीसी न्यूज – विद्येचे माहेरघर आणि आय टी हब असलेल्या पुण्याने देशातील सर्वात चांगल्या आणि राहण्यास योग्य असलेल्या शहरांच्या यादीत पहिले स्थान मिळवले असले तरी, संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक आणि भौतिक सुविधा या श्रेणींमध्ये आणि आरोग्य, आर्थिक घटक, वीजपुरवठा, सुरक्षितता आदी ७८ निर्देशांकांच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यमापनामध्ये पुणे पिछाडीवरच आहे. तर मूल्यांकनात पहिल्या पाच क्रमांकामध्येही पुण्याला स्थान नसून प्रदूषण कमी करण्यासंबंधित उपाययोजना राबवण्यात मात्र पुणे अग्रेसर आहे . 

यात विशेष म्हणजे, श्रेणी आणि निर्देशांक मूल्यांकनात पहिल्या पाच क्रमांकामध्येही पुण्याला स्थान मिळविता आलेले नसले तरीही पुणे सरासरीच्या आधारे अन्य शहरांच्या तुलनेत अव्वल ठरले आहे.

_MPC_DIR_MPU_II

केंद्रीय शहरी मंत्रालयाने राहण्यास योग्य असलेल्या शहरांची यादी सोमवारी जाहीर केली. यामध्ये पुण्याने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. देशातील १११ शहरांमध्ये केंद्रीय शहरी मंत्रालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले. शहरांची निवड करताना संस्थात्मक रचना, प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आला. त्यात पुणे अव्वल असले तरी सर्वेक्षणासाठीचे निकष, त्याचे उपघटक, निर्देशांक अशा बाबींमध्ये पुण्याला पहिल्या पाच क्रमांकामध्येही स्थान मिळविता आलेले नाही.

प्रशासन, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार, वीजपुरवठा, जमिनीचा वापर, शाश्वत वाहतूक आणि वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन अशा वर्गवारीत पिछाडी असली, तरी सरासरीच्या आधारे पुणे शहर अव्वल ठरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1