Thergaon : श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्या वतीने स्तोत्र-मंत्र पठण अन् वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागामार्फत थेरगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र यांच्या वतीने विविध शाळांत एकदिवसीय स्तोत्र-मंत्र पठण तसेच वृक्षारोपण शिबिर घेण्यात आले.

सकाळी 10 ते 11 या एक तासात एका ताला-सुरात विद्यार्थ्यांनी सामूहिक स्तोत्र-मंत्र पठण केले. दुपारी 1 ते 3 यावेळेत शाळा आवारात वृक्षारोपण शिबिर राबविण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र थेरगाव (160 विद्यार्थी), सरस्वती विद्यालय (300 विद्यार्थी), नगुभाऊ बारणे विद्यालय (60 विद्यार्थी), जयवंत बालकमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (250 विद्यार्थी) या शाळांतील 970 विद्यार्थ्यांनी या शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला.

  • या शिबिराला 6 ते 16 वयो गटातील बालसंस्कार विद्यार्थी सकाळी वेळेवर उपस्थित होते. त्यांनी सूचनांचे योग्य पालन केले स्तोत्र-मंत्र पठणाने त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले यावेळी सर्व बालसंस्कार प्रतिनिधी व सहकारी सेवेकऱ्यानी नियोजनपूर्वक काम केले.

आध्यत्मिक गुरू परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे (दिंडोरी नाशिक) यांच्या मार्गदर्शनानुसार बालसंस्कार व युवाप्रबोधन विभाग प्रमुख (त्रंबकेश्वर) नितिन मोरे यांच्या संयोजनाखाली सर्व सेवेकरयांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.