Thergaon : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यामुळे छावा मराठा युवा महासंघाचे जोडे मारो आंदोलन

एमपीसी न्यूज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची (Thergaon) बदनामी केल्यामुळे आज 21 नोव्हेंबर रोजी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने  पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले.

हे आंदोलन थेरगावमधील डांगे चौकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. या वेळेस केंद्र सरकार, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

Thergaon

Pune News : पुणे शहरातील ‘या’ भागांत गुरुवारी पाणी बंद, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

या वेळी (Thergaon) अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रकाश जाधव, मराठा सेवा संघ उद्योग आघाडी राष्ट्रीय, अध्यक्ष दादासाहेब पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ,संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवड, गणेश भाऊ भांडवलकर, पुणे संपर्क प्रमुख, गणेश सरकटे पाटील, सचिन आल्हाट, कार्याध्यक्ष, छावा ट्रान्सपोट मोईन शेख, संभाजी ब्रिगेडचे महेश कांबळे, संजय जाधव, ज्ञानदेव लोभे, किशोर आत्तारगेकर, श्रीकांत जोगदंड, अप्पा गुरव हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.