Thergaon News – दिलीप वेंगसरकारांकडून व्हेरॉकच्या नारायण डोकेचा सत्कार

एमपीसी न्यूज – व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी मध्ये आगामी मौसमाची तयारी म्हणून पावसाळ्यातील सरावाचे विशेष सत्र (Thergaon News ) सुरू असून अकॅडमीचे प्रमुख व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी मंगळवारी (दि 11) थेरगाव अकॅडेमिला भेट दिली.  ह्या प्रसंगी 19 वर्षाखालील अष्टपैलू खेळाडू आणि नुकताच राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी मधून विशेष प्रशिक्षण घेऊन परतलेल्या आणि 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीला विजेतेपद मिळविण्यामध्ये महत्वपुर्ण योगदान देणाऱ्या नारायण डोके ह्याला दिलीप वेंगसरकर ह्यांनी क्रिकेट साहित्य देऊन शुभेच्छा दिल्या.

Pimpri Chinchwad RTO News : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

ह्याप्रसंगी अकॅडमीचे प्रशिक्षक शादाब शेख, चंदन गंगावणे, राहुल वेंगसरकर आणि डॉ.विजय पाटील उपस्थित होते.

नैसर्गिक गुणवत्ता असलेल्या नारायणला डोके याला अकॅडमीच्या वतीने सर्वोतोपरी साह्य करण्याच्या “कॅच देम यंग” ह्या धोरणानुसार क्रिकेट साहित्याबरोबरच
गेली पाच वर्षे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने पुरस्कृत केले असून निवास आणि आहारभत्ता म्हणून आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

नारायण डोके अतिशय गरीब कुटुंबातुन आलेला होतकरू खेळाडू असून नारायणचे वडील सोलापूर येथे वडापाव आणि सामोसे विकून चरितार्थ चालवीत आहेत.

नेट्स मधील नारायणचा सराव पाहून दिलीप वेंगसरकर यांनी समाधान व्यक्त करत काही टिप्स देत  प्रशिक्षकांनाही अधिक मेहनत घेण्याबाबत विशेष सूचना (Thergaon News)  दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.