Thergaon: राष्ट्रभक्ती हेच शिवचरित्राचे सार -संतोष तोत्रे

एमपीसी न्यूज – राष्ट्रभक्ती हेच शिवचरित्राचे सार आहे, असे मत शिवव्याखाते संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डांगेचौक, थेरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज समाज प्रबोधन पर्व 2020 निमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना राष्ट्रभक्ती या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. या व्याख्यानमालेचे उद्धाटन महापौर उषा ढोरे यांनी केले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक निलेश बारणे, नगरसेविका झामाबाई बारणे, माजी नगरसदस्य सिद्धेश्वर बारणे, गजानन चिंचवडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जिवनविद्या मिशनचे शैलेश जोशी, विश्वास देशपांडे, गिरिश सुकाळे, महेंद्र मारणे, मंगेश परब, रमेश निकम, बाळासाहेब मरळ, जयवंत साळुंखे, सखाराम कोळंबकर, दिलिप पवार, केशव माने, शामराव गायकवाड आदी उपस्थित होते.

शिव व्याख्याते संतोष तोत्रे म्हणाले, ‘रयतेवर होणारे अन्याय, अत्याचार पाहून यातुन ही जनता कशी बाहेर पडेल याचा राजमाता जिजाऊ सतत विचार करत होत्या. रयतेच्या कल्याणाचे स्वराज्य निर्माण करण्याचे सरकार त्यांनी बाल शिवबाच्या मनात बिंबवले. हाच राष्ट्रभक्तीचा अंगार शिवाजीमहाराजांनी आपल्या सवंगड्यामध्ये पेटविला. त्यातूनच मध्ययुगीन जगाला कलाटणी देणारे व स्वतंत्र्याची प्रेरणा मानवी मनात पेरणारे एक असामान्य व अलौकिक स्वराज्य साकारले. म्हणून ‘राष्ट्रभक्‍ती ‘ हेच शिवयरित्राचे सार आहे.

खासदार बारणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचणे गरजेचे असल्याने अशा प्रकारे व्याख्यानमाला होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर, सूत्रसंचानल किशोर केदारी यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2