Thergaon : थेरगाव सोशल फाऊंडेशनने राबविली सोसायटी वृक्षारोपण मोहीम

एमपीसी  न्यूज – सोसायटी तुमची झाडे आमची या संकल्पने अंतर्गत आज पहिली वृक्षारोपण मोहीम सनफ्लॉवर गार्डन सोसायटी, डांगे चौक थेरगाव येथे राबविण्यात आली.

थेरगाव सोशल फाऊंडेशन व सोसयटी सभासदांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पार पडला. यामध्ये विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. या वृक्षारोपण मोहिमेत आपल्याला देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे तसेच लाला माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निलेश पिंगळे यांनी फाऊंडेशनबाबत माहिती दिली. सोसयटी मेंबरनी सर्व टीएसएफ मेंबरचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.