Thergaon : अकराव्या मजल्यावरून पडुन कामगाराचा पडून मृत्यु, ठेकेदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज – सेंट्रिंग चे काम करत असताना 11 वय मजल्यावरून सुरक्षा जाळी (Thergaon)सह पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी थेरगाव येथील सिल्व्हर क्रिस्टल या बांधकाम चालू असलेल्या इमारतीत घडला.

राम नरेश यादव (वय 41) असे मयत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनीच फिर्याद देत साईट चे ठेकेदार जितेंद्र बाळकृष्ण कोतकर (रा.पाषाण) त्याचा भागीदार रणजीत दिलीपराव बनकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : बारामतीतून पार्थ पवार लढले तर? आमदार रोहित पवार म्हणतात…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनरेश यादव हा इमारतीच्या (Thergaon)अकराव्या मजल्यावर सेंट्रींग चे काम करत होता. यावेळी तोल जाऊन तो खाली कोसळला . दरम्यान नवव्या मजल्यावर सुरक्षा जाळी होती,परंतु ती निकृष्ट दर्जाची असल्याने रामनरेश जाळी सह खाली प्लंबिंगच्या डक्ट मध्ये पडला. यात त्याच्या मेंदूला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

संबंधित इमारत ही बारा मजल्यांची असून येथे केवळ नवव्या मजल्यावर सुरक्षा जाळी होती. ती देखील निकृष्ट असल्याने ती तुटली. उंचावरील काम करत असताना ठेकेदाराने दोन-तीन जाळ्या लावणे व त्यांचा मेंटेनन्स करणे हे अपेक्षित असते. मात्र अशी कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने कामगाराचा पडून मृत्यू झाला. यावरून पोलिसांनी दोन्ही ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.