Pune : पालखी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चोरट्यांचा झटका

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चोरट्यांनी चांगलाच झटका दिला आहे. काही भाविकांचे मोबाईल तर काहींचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.  
 

डेक्कन येथील संभाजी महाराज परुतळ्याजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या दत्ता सिध्देकर (23, रा. डेक्कन) यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धेकर यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात डेक्कन पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  
 
दुस-या घटनेत माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी फर्ग्यूसन रस्त्यावरील गुडलक चौकात आलेल्या विनायक जाधव यांचा मोबाईलही अज्ञात चोरट्याने चोरून नेला. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. दिघी येथे एका 48 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे दागीने चोरट्याने चोरून नेले आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.