Jadhavwadi : थोरांदळे येथे 200 फूट बोअरवेलमध्ये अडकला मुलगा

एमपीसी न्यूज – आंबेगाव तालुक्यातील जाधववाडीजवळील थोरांदळे येथे 200 फूट बोअरवेलमध्ये सहा वर्षाचा मुलगा पडल्याची घटना नुकतीच घडली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. रवी पंडित बिल (वय 6) असं त्या मुलाचे नाव आहे.

रस्त्याचं काम सुरू होतं, तेथील कामगाराचा मुलगा खेळत खेळत त्या बोअरवेलकडे गेला अन सुमारे 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला.

घटनास्थळी नागरिकांनी एकाच गर्दी केली असून आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलिसही पोहचले आहेत. यंत्रसामग्रीद्वारे मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.