Today’s Horoscope 01 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 01 January 2024- जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख -01.01.2024.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – मघा 8.36 पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.

—————————–

मेष – ( शुभ रंग – केशरी)

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.

वृषभ – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोड निर्माण होईल. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

मिथुन – ( शुभ रंग- राखाडी)

आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असेल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

कर्क – ( शुभ रंग – मोतिया)

आज तुमची मिळकत उत्तम असेल गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. फार अर्जंट नसतील तर टाळा.

सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)

महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचार करूनच घ्या. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेलेच सल्ले महत्त्वाचे असतील. कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशा पदरात पडू शकेल.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)

आज मी पण प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वणीने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

तूळ- ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्राकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शेअर्सच्या व्यवहारातील तुमचे अंदाज खरे ठरतील.

वृश्चिक- ( शुभ रंग – पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी वर्गाशी सलोखा वाढेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होईल. संध्याकाळी प्रिय मित्रांचा सहवास लाभेल.

धनु -(शुभ रंग- आकाशी)

आज वडीलधाऱ्या मंडळींशी काही वैचारिक मतभेद संभवतात. परंतु त्यांच्या शब्दाचा तुम्ही मान राखाल. आज काही खोटी आश्वासने देणारे मित्र भेटतील. त्यांना दुरूनच राम राम करा.

मकर- ( शुभ रंग – जांभळा)

नवीन व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी आज नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. हीतशत्रू टपूनच बसलेत सतर्क रहा.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.

मीन – ( शुभ रंग- आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच असतील. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील. आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.