Alandi : गेल्या सात ते आठ दिवसांपासून आळंदीत अवेळी पाणीपुरवठा ;शहरातील दिवसाआड पाणीपुरवठयाला चार वर्ष पूर्ण

एमपीसी न्यूज – इंद्रायणी काठच्या गावातील मैलामिश्रित व (Alandi )रासायनिक मिश्रित पाणी या मुळे इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढी झाली. आळंदी येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे प्रदूषित पाणी शुद्ध करताना जास्त वेळ जात होता.

शहरातील टाक्या भरण्यास विलंब होत होता.व संपूर्ण आळंदी शहरात पाणीपुरवठा करण्यास ताण निर्माण होता.याचा उपाय म्हणून दि.31 डिसेंबर 2019 रोजी आळंदीचे तत्कालीन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी आळंदीत खेड विभाग व हवेली विभाग असे झोन करत दिवसा आड पाणी पुरवठा सुरू केला. आज त्याला 4 वर्ष पूर्ण होत आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये कुरुळी येथून पुणे मनपा च्या योजनेला टॅपिंग करून आळंदी शहराला भामा आसखेड चे पाणी मिळाले असले तरी आळंदी शहरात खेड विभाग व हवेली विभाग असा दिवसा आड पाणीपुरवठा चालूच आहे. त्यात भामा आसखेड येथे विद्युत यंत्र दुरुस्ती ,आळंदी कडे येणाऱ्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याने पाणी गळती व कमी दाबाने पाणीपुरवठा अश्या इ. विविध समस्या आल्याने त्याचा परिणाम आळंदी शहरात होताना पूर्णपणे दिसून येतो.

Talegaon : वर्षाखेरीस पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

शहरात खेड विभाग व हवेली विभाग असा दिवसा आड पाणीपुरवठा होत असल्याने पाणी गळती,वीज यंत्र दुरुस्ती समस्या आल्याने पाणी पुरवठा त्या-त्या विभागात उशिराने होतात.अश्या या परिस्थितीत शहरात खेड व हवेली विभागात सलग तीन चार दिवस पाणीपुरवठा होऊ शकत नाही असा अनुभव ही काहीवेळा आळंदीकरांनी अनुभवला आहे.या पाणी टंचाईत विकत टँकर आळंदीकरांनी घेतले व तसेच काहींनी आजू बाजूच्या कुपनलिके द्वारे पाण्याची सुविधा केली.

यात काही गेल्या सात ते आठ दिवसांपासून पुणे मनपा द्वारे भामा आसखेड चा पाणीपुरवठा कमी दाबाने आळंदी शहरास होत आहे.याचा परिणाम आळंदी शहराच्या पाणीपुरवठया वर झालेला आहे.

आळंदी शहरात पाणी पुरवठा अवेळी होऊ लागला आहे.पाण्याचा दाब कमी असल्याने सद्यस्थितीत या काही दिवसां मध्ये खेड विभागात दुपारी ते संध्याकाळ असा अवेळी काही विभागात पाणीपुरवठा होत असून राहिलेले खेड विभागातील टप्पे दुसऱ्या दिवशी सकाळी होतात.तीच परिस्थिती हवेली विभागात दिसून येत आहे.यामुळे नागरिकांना कोणत्या निश्चित वेळी पुरवठा होईल याची कल्पना नाही.

मंगेश तिताडे यांनी यावेळी सांगितले नगरपालिकेनेसद्यस्थितीत कोणत्या विभागात कोणत्या वेळेत पाणीपुरवठा होईल याची वेळ सोशल मीडिया द्वारे
कळवावी.किमान नागरिकांना कोणत्या विभागात कोणत्या वेळी पाणीपुरवठा होईल हे कळेल.

मनपा द्वारे पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. भामा आसखेड चा पाणीपुरवठा पूर्वरत जास्त प्रेशरने व्हा यासाठी पुणे मनपा आधिकऱ्यांशी संपर्क साधला आहे. पाणीपुरवठा जास्त दाबाने मिळाल्यासदोन दिवसांत पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत होऊन नियमित वेळेत होईल. असे यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले.

तसेच ते म्हणाले भामा आसखेड पाणीपुरवठा वीजबिल (इ. खर्च) मनपा ला (थक्कबाकी)देणे आहे.वर्षाला पुणे मनपा देणे व आळंदी जलशुद्धीकरण केंद्र यांचा मिळून एक कोटी ऐंशी लाख ते दोन कोटीच्या आसपास खर्च होत असतो.

काही भागात नागरिक पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करताना दिसून येत आहेत तो अपव्यय करू नये.असे पालिके च्या मार्फत आवाहन करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.