Today’s Horoscope 02 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार शनिवार …. ​दि​.  02 जानेवारी 2021

 

  • शुभाशुभ विचार –०९ नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष –संकष्ट चतुर्थी.
  • राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आश्लेषा २०.१७ पर्यंत, नंतर मघा.
  • चंद्र राशी – कर्क २०.१७ पर्यंत नंतर सिंह.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- राखाडी)

स्थावर इस्टेटीचे रखडलेल्या कामांना गती येईल. मानसिक शांतता लाभेल व आरोग्यही उत्तम राहील. आज अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल.

वृषभ – ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन मनाजोगत्या नोकरीचे प्रस्ताव येतील. भावाभावांमध्ये सामंजस्याची भावना राहील.

मिथुन – ( शुभ रंग – पिस्ता)

कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची चणचण भासणार नाही. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

आज तुमच्या वागण्यात इतरांना लहरीपणा जाणवेल. आज तुम्ही स्वतःचेच खरे कराल. तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे काही आपलीच माणसे दुखावली जातील.

सिंह – ( शुभ रंग- हिरवा)

मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. विश्वासातील माणसाकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आज कोणालाही न मागता सल्ला देऊ नका.

कन्या – ( शुभ – रंग भगवा)

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह जुळवणी विषयी  बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य आहे. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल कराल.

तुळ – (शुभ रंग- नारिंगी)

आकस्मिकपणे आलेल्या व्यवसायिक अडचणींवर यशस्वीपणे मात कराल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर मुळीच अवलंबून राहू नका. आज सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. ध्येय सध्या होतील.

.

वृश्चिक – ( शुभ रंग  केशरी)

कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीरीत्या हाताळाल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे हमखास फळ मिळेल. संततीकडून काही चांगल्या बातम्या येतील.

धनु – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला बेचैन करतील. कौटुंबिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होईल. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेसे मतभेद होतील परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी)

ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना सल्ले देण्याचा ठेका घेऊ नये. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असणे हिताचे राहील. आजी-आजोबांनी घरगुती प्रश्‍नात लक्ष न घालता देवधर्मात रमावे.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. नवीन ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून पिणे हिताचे राहील. गाडी चालवताना कोणतीही रिस्क नको.

मीन – ( शुभ रंग -आकाशी)

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल असेल, विलासी वृत्ती बळावेल, कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वकांक्षा वाढणार आहेत प्रेम वीरांसाठी आज ग्रीन सिग्नल आहे.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.