Today’s Horoscope 04 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 04 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- सोमवार.

तारीख – 04.03.2024.

शुभाशुभ विचार- 16 नंतर चांगला.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 7.30  ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – ज्येष्ठा 16.21 पर्यंत नंतर मूळ.

चंद्र राशी – वृश्चिक 16.21  पर्यंत नंतर धनु.

—————————–

मेष – ( शुभ रंग – क्रीम)

आजचा दिवस उद्योगधंद्याच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. आज तुमची तब्येतही जरा नरमच असेल. पती-पत्नी मधील वादावर मौन हा रामबाण उपाय राहील.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

मिथुन – ( शुभ रंग- तांबडा )

ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. जुने दुखणे अंगावर काढू नका. काही येणे असेल तर मागायला लाजू नका. गृहिणीसाठी अतिव्यस्त दिवस.

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)

बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे गरजेचे वाटेल. कलाकारांच्या लोकप्रियतेत वाढ होईल. गृहिणी आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ काढतील.

सिंह -( शुभ रंग – हिरवा)

घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. सर्व कामे आज सुरळीत पार पडतील. आनंदी उत्साही दिवस.

कन्या – ( शुभ रंग- लाल)

नोकरदार वरिष्ठांच्या मागेपुढे करतील. कलाकारांच्या उमेदवारीला यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. लेखकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल.

तूळ- ( शुभ रंग- आकाशी)

राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र धंद्यातील आवक वाढवेल. अंगी असलेले वक्तृत्व गुण कामी येतील. विरोधकांनाही तुमची मते पटवून देता येतील.

वृश्चिक – ( शुभ रंग – केशरी)

महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्याच मतावर अडून राहाल. अति आत्मविश्वास आज नुकसानाला कारणीभूत ठरू शकेल. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. सुसंवाद गरजेचा आहे.

धनु – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरायला हवी. सत्संगातून मनशांती मिळेल.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल.

कुंभ – (शुभ रंग- निळा)

आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने सकारात्मकतेने स्वीकाराल. वाणित मृदूता ठेवून अनेक किचकट प्रश्न सहजच मार्गी लावाल.

मीन – ( शुभ रंग- अबोली)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपूनच करा. उपासनेत खंड पडू देऊ नका.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.