Today’s Horoscope 05 March 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार –  शुक्रवार – 04 मार्च 2021

 

  • शुभाशुभ विचार — 09 नंतर चांगला.
  • आज विशेष – कालाष्टमी
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अनुराधा 22.38 पर्यंत नंतर  ज्येष्ठा .
  • चंद्र राशी –  वृश्चिक.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमच्या जमा-खर्चाचा तराजू थोडासा डळमळीत होणार आहे. हौस मौज करण्यावर काही मर्यादा येतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेफार मतभेद होतील.

वृषभ – ( शुभ रंग – पांढरा )

अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस सत्कारणी लावा. परिवारात सामंजस्य राहील विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

मिथुन – ( शुभ रंग -पिस्ता)

नोकरीच्या ठिकाणी स्वतःचे महत्त्व सिद्ध करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. विरोधक सक्रिय आहेत सतर्क राहा.

कर्क – ( शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्ही कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही. प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

सिंह – (शुभ रंग- गुलाबी)

कौटुंबिक जीवन समाधानी असेल. मागण्या पूर्ण झाल्यामुळे बच्चे कंपनी खुश असेल. गृहिणींना कुटुंबात मोठेपणा मिळेल. कलाकारांना मात्र कामे शोधावी लागणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल. भावंडात सामंजस्य असेल. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारात कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क रहा.

तूळ – (शुभ रंग – आकाशी)

आज खिशात पैसा खेळता राहील मोठेपणा घेण्यासाठी स्वतःहून काही खर्च कराल. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. आज अहंकार सोडा वाणीत थोडी मृदूता असू द्या.

वृश्चिक – ( शुभ रंग- मरून)

सगळी महत्वाची कामे आज दुपार पूर्वीच करून मोकळे व्हा. सहकाऱ्यांवर विसंबून राहू नका. एखादी गहाळ झालेली वस्तू पुन्हा शोधलीत तर नक्की सापडेल.

धनु – ( शुभ रंग-मोरपंखी)

काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील.आज तुम्ही एखादी सुरक्षित गुंतवणूक करण्याचाही विचार कराल. रात्रीचा प्रवास करणार असाल तर प्रवासात जागेच रहा.

मकर – ( शुभ रंग- राखाडी)

आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाला मान राहील.

कुंभ – ( शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात काही नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागणार आहेत. कौटुंबिक समस्या वडीलधाऱ्याच्या मदतीने सुटतील.

मीन –  ( शुभ रंग- मोतिया)

नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल वरिष्ठांचे मूड सांभाळणे कठीण होईल. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला  शब्द देऊ नका, कारण त्यामुळे फसगत होईल.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.