Today’s Horoscope 06 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 06 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

06.08.2023.

शुभाशुभ विचार- क्षयतिथी.

आज विशेष- सामान्य दिवस

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – रेवती.

चंद्र राशी – मीन.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज दिवस खर्चाचा आहे बचतीचा विचार सोडूनच द्या. आज गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. प्रवासाचा आनंद लुटाल.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. जे जे चिंताल ते ते होणार आहे. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. संध्याकाळी अनपेक्षित खर्च उद्भावेल.

मिथुन ( शुभ रंग- मरून )

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. संध्याकाळी सहकुटुंब मौज मजेस प्राधान्य द्याल.

कर्क (शुभ रंग- जांभळा)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. सरकारी कामे मात्र रखडतील. गृहिणी आज दानधर्म करतील.

सिंह (शुभ रंग- लाल )

कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वतःला जपा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासातील व्यक्तींकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

कन्या ( शुभ रंग- निळा)

कुटुंबात सामंजस्य असल्याने तुमचे मनोबलही उत्तम असेल. आज तुम्ही जोडीदाराचे हट्ट पुरवण्याचा प्रयत्न कराल. संध्याकाळी कामावरून येताना गाडी हळू चालवा.

तूळ ( शुभ रंग- मोतिया)

कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)

हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी तुम्ही पैसा व वेळही खर्च कराल. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येऊ शकते.

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. तुम्हाला मुलांच्याही अभ्यासात डोकवावे लागणार आहे. आज गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल.

मकर ( शुभ रंग- पांढरा )

आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा करू नये.

कुंभ (शुभ रंग – आकाशी)

आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल काही हवे हवेसे वाटणारे पाहुणे घरी पाय धुळ झाडतील खरे बोलण्यापेक्षा आज गोड बोलणेच हिताचे राहील.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )

आज स्वतःचेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावध राहा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.