Today’s Horoscope 06 December 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  रविवार. ….. ​दि​.  06 डिसेंबर 2020

  • शुभाशुभ विचार – ०८ पर्यंत चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – संध्याकाळी ०४.३० ते ०६.००.
  • दिशा शूल -पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – आश्लेषा १४.४६ पर्यंत, नंतर मघा.
  • चंद्र राशी – कर्क १४.४६ पर्यंत, नंतर सिंह.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

आज कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन केले तर यशाचा मार्ग सोपा होईल. आज गृहसौख्याचा दिवस. मोफत सल्ले देणारी माणसे बोअर करतील.

वृषभ – ( शुभ रंग – मरून )

इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. समाजिक कार्य करणाऱ्यांना समाजात आदर मिळेल

मिथुन ( शुभरंग- निळा )

पत प्रतिष्ठा वाढेल आज आप्तस्वकीय तुमच्या शब्दास मान देतील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस.

कर्क( शुभ रंग- मोतिया )

कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. जोडीदारास दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न कराल.

सिंह – (शुभ रंग- आकाशी )

तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. हट्टीपणा सोडून आज संयमाने वागण्याची गरज आहे.

कन्या ( शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन ताजेतवाने होईल.

तूळ ( शुभ रंग- केशरी )

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आपल्या कर्तुत्वास थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. वाणीत मृदुता हिताची राहील.

वृश्चिक ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. कार्यक्षेत्रात श्रमसफल्या चे समाधान मिळेल दैव आज तुमच्या बाजूने आहे. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील

धनु ( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद होतील पण फार ताणून धरू नका.

मकर – ( शुभ रंग- आकाशी )

आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आज इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा.

कुंभ ( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा. कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील.

मीन ( शुभ रंग- पांढरा)

व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. आज तुमच्या कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल सावध रहा.
!! शुभं भवतु!!

 

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.