Maharashtra Corona Update : आज 5,834 जण कोरोनामुक्त; 4,922 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज 5 हजार 834 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर, 4 हजार 922 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 17 लाख 15 हजार 884 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.88 टक्के झाले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 47 हजार 509 इतकी झाली आहे. त्यापैकी राज्यात एकूण 82 हजार 849 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 95 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 44 मृत्यू हे मागील 48 तासातले आहेत. तर 11 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित 40 मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या काळातील आहेत

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.58 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 12 लाख 5 हजार 118 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 47 हजार 509 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 5 लाख 60 हजार 685 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 5 हजार 855 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.