Today’s Horoscope 06 September 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – सोमवार, दि. 06 सप्टेंबर 2021

 

  • शुभाशुभ विचार – क्षयदिन.
  • आज विशेष-पिठोरी अमावास्या.
  • राहू काळ – सकाळी 7.30  ते 9.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – मघा 17.51 पर्यंत नंतर पूर्वा.
  • चंद्र राशी – सिंह.

 

आजचे राशीभविष्य –

मेष – (शुभ रंग – मोतिया)

तब्येतीच्या किरकोळ असलेल्या तक्रारीही दुर्लक्षित करू नका. उतावीळपणे कोणतेही निर्णय घेऊ नका. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील.

वृषभ – ( शुभ रंग- सोनेरी )

बरेच दिवसापासून तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा आज फोन येईल. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांना मात्र निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

मिथुन – ( शुभरंग – केशरी )

ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. वाद-विवाद संभवतात. केवळ आपल्या अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्याला प्राधान्य द्या.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. परंतु भावनेच्या भरात कोणालाही कसलीही वचने देऊ नका.

सिंह – ( शुभ रंग – मरून )

आज तुमचा आत्मविश्‍वास वाढवणार्‍या काही घटना घडतील. एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवावेत.

कन्या –( शुभ रंग- डाळिंबी )

आज काही दुरचे नातलग संपर्कात येणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.

तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )

जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी )

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्ह्यूसाठी कॉल येतील. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. घरगुती कामे दुर्लक्षित होतील.

धनु – (शुभ रंग- जांभळा )

हितशत्रू सक्रीय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज परिश्रमाने यश सोपे होईल दैवाची साथ तर आहेच. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी )

विरोधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.

कुंभ- (शुभ रंग- मोरपिशी)

घराबाहेर आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. प्रवासात मात्र खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

अती श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. रिकामटेकड्या चर्चेतुन वाद होण्याची शक्यता आहे.

!! शुभम भवतु!!

श्री. जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी आणि वस्तू सल्लागार )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.