Today’s Horoscope 1 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग.  वार –  गुरुवार. 1 एप्रिल  2021

  • शुभाशुभ विचार – 07 नंतर चांगला दिवस.
  • आज विशेष – साधारण दिवस.
  • राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल.
  • आजचे नक्षत्र – विशाखा 7.22 पर्यंत नंतर अनुराधा.
  • नक्षत्र पाया- ताम्र.
  • चंद्र राशी – वृश्चिक.

आजचे राशीभविष्य

मेष -( शुभ रंग मोरपिशी)

आज कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. सतत कामामुळे दिवस कंटाळवाणा जाईल. मोफत सल्ला देणारी माणसे बोअर करतील. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.

वृषभ –( शुभ रंग जांभळा )

इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आज संध्याकाळी लवकर घर गाठा. जोडीदार आज आतुरतेने वाट पाहात असेल.

मिथुन –( शुभ रंग- मरून )

नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागेल. काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने सोडवाल. परंतु आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

कर्क – ( शुभ रंग- मोतिया )

आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील. आज प्रवासात थोडा त्रास होईल.

सिंह – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. मुलांचे लाड करताना त्यांच्या शिस्तीस ही प्राधान्य  देणे गरजेचे आहे.

कन्या –( शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या.
प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार आज नकोत. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.

तूळ –( शुभ रंग- केशरी )

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. वाणीत मृदुता हिताची राहील. आज शेजारी रुसून बसतील.

वृश्चिक –( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील. आज तुम्ही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.

धनु –( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. पायपीट होईल.

मकर –( शुभ रंग- आकाशी )

आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. इच्छापूर्ती चा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.

कुंभ –( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना सहज तोंड द्याल.
आपल्या पिताश्रींनी दिलेले सल्ले विचारात घ्या. मोठ्या लोकांच्या ओळखीतून आपले हित साधून घेता येईल

मीन  – ( शुभ रंग- पांढरा)

ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपुन वापरावी. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. तरुणांनी कुसंगत टाळावी. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल सावध रहा. संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील.

 

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.