Corona Testing Rate : 500 रुपयांत आरटीपीसीआर; 150 रुपयांत रॅपीड अँटीजेन टेस्ट

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना चाचणीचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. सुधारित दरानुसार खासगी प्रयोगशाळांमध्ये 500 रुपयांत आरटीपीसीआर, तर 150 रुपयांमध्ये रॅपीड अँटीजेन टेस्ट करता येणार आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार यापुढे राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे.

याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्टसाठी 150 रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.