Today’s Horoscope 12 December 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार – रविवार, दि. 12.12.2012.

  • शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
  • आज विशेष — साधारण दिवस.
  • राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 24.00 पर्यंत नंतर रेवती.
  • चंद्र राशी – मीन.

—————————————

आजचे राशिभविष्य 

मेष – (शुभ रंग – मरून)

रिकामटेकड्या चर्चेत व वाद विवादात तुमचा वेळ फुकट जाईल. खर्च आवाक्‍याबाहेर जाईल, महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील.

मिथुन – (शुभ रंग- गुलाबी)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. आज तुम्ही कर्तव्याला प्राधान्य द्याल.

कर्क – (शुभ रंग – पिस्ता)

नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. आज वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल व सहकाऱ्यांशी ही जुळवून घ्यावे लागेल. मीपणा सोडलात तर बरीचशी कामे सोपी होतील.

सिंह – (शुभ रंग – पांढरा)

तरुणांनी कुसंगती पासून लांब रहावे. नीतीबाह्य वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. सासुरवाडी करून एखादा धनलाभ होऊ शकतो.

कन्या – (शुभ रंग- चंदेरी)

नोकरीत वरिष्ठ खुश असतील. हाताखालच्या माणसांवर वचक राहील. आज तुम्ही काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतील.

तूळ –  (शुभ रंग – सोनेरी)

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. वेळीच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. दुकानदारांची उधारी उसनवारी वसूल होईल. हितशत्रू सक्रिय आहेत तुम्ही सतर्क राहा.

वृश्चिक – (शुभ रंग – नारंगी)

महत्त्वाच्या कामास विलंब होईल बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील हाती असलेला पैसा जपून वापरा. आज प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

धनु – (शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

मकर – (शुभ रंग- निळा)

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. कदाचित शेजाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज लागेल.

कुंभ – (शुभ रंग- क्रीम)

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल, त्याचप्रमाणे खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. नाती जपायची असतील तर आज स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून फक्त गोड गोड बोला.

मीन – (शुभ रंग- जांभळा)

आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपले व्यक्तिमत्व प्रभावी राहील. आवक पुरेशी असली तरी आज बचतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन 9689165424
(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.